
महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सत्तेवर आल्यापासून विरोधीपक्षाकडून सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. यातच भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (Shiv Sena) पक्षावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीली अधिक जागा मिळाल्या तरीदेखील राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे, असे विधान करुन नारायण राणे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष केवळ स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर, असे कधीच घडले नसते. नारायण राणे यांनी हे वक्तव्य करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाअगोदर भाजप-शिवसेना एकत्र होती. तसेच दोन्ही निवडणूकही एकत्र लढवली होती. पंरतु, निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी हात मिळवणी करुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यावर नारायण राणे यांनी नाराजी दर्शवत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत हात मिळवणी करुन सत्ता स्थापन केली आहे. आज या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असते तर, कधीच असे झाले नसते. तसेच हे सरकार स्थापन झाल्यापासून कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नाही. एवढेच नव्हेतर हे तिन्ही पक्ष आपल्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- सिंचन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एसीबी कडून पूर्णपणे क्लिनचीट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 161 जागा मिळाल्या होत्या. तरीदेखील महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केवळ विकासाच्या कामाला स्थगती देण्याचे काम करत आहे, असा आरोपही विरोधीपक्षांकडून करण्यात येत आहे.