Mahayuti Govt | X @Devendra Fadnavis

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवस उलटून गेल्यानंतर महायुती सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी होऊन बरेच दिवस उलटून गेले तरीसुद्धा महाराष्ट्रात मंत्रिमंडळ (Cabinet Maharashtra) अस्तित्वात येऊ शकले नाही. दस्तुरखुद्द दोन्ही उपमुख्यमंत्रीदेखील बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळू शकेल याबाबत उत्सुकता आहे. यामध्ये काही जुन्या तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, असे राजकीय वर्तुळात मांडले जातत आहे. पण, असे असले तरी मंत्र्यांच्या नावाची साधी यादीही जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे मंत्रिमंळात समावेश होऊ शकेल अशा संभाव्य नावाची चर्चा सुरु झाली आहे. कोणती आहेत ही नावे, ज्यांचा होऊ शकेल मंत्रिमंडळात समावेश.

महायुती सरकारमधील विद्यामान मंत्री

देवेंद्र फडणवीस: मुख्यमंत्री

अजित पवार: उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे: उपमुख्यमंत्री

मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतील असे संभाव्य चेहरे

भाजप: आशिष शेलार, गिरीश महाजन, राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), सुधिर मुनगंटीवार यांना महत्त्वपूर्ण भूमिका मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकणातून रवींद्र चव्हाण, नितेश राणे आणि गणेश नाईक मंत्रिमंडळात असण्याची शक्यता आहे. मुंबईत संभाव्य उमेदवारांमध्ये मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांचा समावेश होऊ शकतो. तथापि, लोढा यांचा समावेश केल्यास नार्वेकर कॅबिनेट पदापासून वंचित राहू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (हेही वाचा, Eknath Shinde Takes Oath as Dy CM: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना केला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा उल्लेख (Watch Video))

संपूर्ण महाराष्ट्रात प्रादेशिक प्रतिनिधित्व

भाजपच्या मंत्रिमंडळाच्या निवडीमध्ये विविध प्रदेशांतील प्रतिनिधित्वावर भर दिला जातो, असे मानतात. परिणामी राज्यातील विविध भागांतील नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. विभागवार संभाव्य चेहऱ्याची यादी खालील प्रमाणे:

पश्चिम महाराष्ट्रः शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसळ आणि राधाकृष्ण विखे पाटील हे संभाव्य मंत्री आहेत.

विदर्भः चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या प्रमुख भूमिकेत दिसू शकतात.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मंत्रिपदास कात्री?

भाजप 17 संभाव्य कॅबिनेट पदांसह वर्चस्व गाजवण्याची तयारी करत असताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला केवळ सात पदांवर समाधान मानावे लागू शकते. ज्यामुळे महायुती सरकारमध्ये काहीशी खदखद पाहायला मिळू शकते. (हेही वाचा, Eknath shinde: 'हे सामान्य जनतेचे सरकार, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही', लातूरच्या 103 शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसांवर एकनाथ शिंदेंचे वक्तव्य)

शिवसेना संभाव्य मंत्री: एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, नगरविकास), शंभुराजे देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार आदी मंडळी प्रमुख भूमिकेत दिसू शकतात.

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही तगडी फौज आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांसारख्याचेहऱ्यांना संधी मिळू शकते.

राज्यातील जनेतने महायुतीच्या पारढ्यात जबरदस्त बहुमत टाकले आहे. विरोधक या बहुमतास पाशवी बहूमत म्हणत आहेत. असे असले तरी आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी राज्यात महायुती सरकार सत्तेत आहे. त्यामुळे भाजप एकहाती सत्ता स्थापन करणे शक्य असले तरी, भाजपला सत्तेचा वाटा मित्रपक्षांनाही द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत तो किती द्यायचा याबाबत मात्र अनेक प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे महायुती सरकारमधील सत्तावाटप कसे होते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.