महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, शिवसेना-भाजप पुन्हा युती; रामदास आठवले यांची भविष्यवाणी
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathvale) आपल्या कवितेसाठी किंवा एखाद्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात. नुकताच केंदिय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्य केले की मार्च मध्ये महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पडणार त्याच्या या वक्तव्याला रामदास आठवले यांनीही दुजोरा दिला आहे. अडीज वर्ष झाल्यावर हे सरकार नक्कीच पडेल आणि शिवसेना (Shivsena) भाजपसोबत (BJP) युती करेल असे रामदास आठवले म्हणाले. तसेच भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेनेने आपला निर्णय बदलावा. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. त्यासाठी भाजप शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत असे आठवले यांनी म्हटले. रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर भर दिला. रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं असेही रामदास आठवले यांनी म्हटले. अजूनही भाजप आणि शिवसेना यांचे सरकार स्थापन होऊ शकतं असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. (हे ही वाचा Nawab Malik Tweet: गेल्या काही दिवसांपासून दोन अज्ञात लोक माझ्या घराची पाहणी करत आहेत, नवाब मलिकांचा दावा, संशयितांचा फोटो केला ट्विट.)

रामदास आठवले यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक विषयावरून वाद आहेत. हा विकास आघाडीमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचारा संबंधी आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी चौकशीदेखील सुरू आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रााच्या सत्तेत राहणे योग्य नाही, असेही आठवले म्हणाले.