केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी महाविकासआघाडी (MVA) सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील सरकार हे महाविकासआघाडी सरकार नव्हे तर महावसूली सरकार (Maha Vasooli Aghadi) आहे. आजवर एखाद्या ठिकाणी दहशतवाद्यांनी स्फोटकं ठेवल्याचे ऐकले होते. परंतू, पोलिसांनी एखाद्या ठिकाणी ठेवल्याचे पहिल्यांदा ऐकले. त्यामुळे राज्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. सचिन वाझे प्रकरणात शिवसेना पक्षाचे जवळचे संबंध असल्यामुळेच मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते सचिन वाझे यांची पाठराखण करत होते. जेणेकरुन सत्य पुढे येऊ नये.
पोलिसांनी ज्या पद्धतीने जिलेटीन भरलेली गाडी अंबानी यांच्या निवस्थानाजवळ ठेवली ते पाहता देशात अशा प्रकारची गद्दारी कधीच पाहायला मिळाली नव्हती. गेल्या महिन्या दोन महिन्यात महाराष्ट्रात जे घडलं. ते अत्यंत अर्थक्य होतं. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनी राज्याच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगली गेली. पोलिसच एखाद्या ठिकाणी बॉम्ब ठेवतात हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळाले. या प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. महाराष्ट्रातील सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या सरकारने तत्काळ राजीनामा देऊन सत्तेतून दूर व्हावे, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
It is clear that Maharashtra's Maha Vikas Aghadi (MVA) is actually 'Maha Vasooli Aghadi'. Its common minimum programme is 'collect money through police': Union Minister and BJP leader Prakash Javadekar pic.twitter.com/SFkA05JRVS
— ANI (@ANI) April 8, 2021
महाराष्ट्रात सत्तेत असलेले सरकार हे जनादेशामुळे सत्तेत आले नाही. विधानसभा निवडणुका झाल्या त्या वेळी शिवसेना-भाजप युती होती. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लाऊन प्रचार केला. आपले उमेदवार निवडूण आणले. पुढे जाऊन केवळ वसूली हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविकासआघाडी सरकार सत्तेत आले, असा घणाघाती आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला.