Nitesh Rane | (Photo Credit: YouTube)

Nitesh Rane's 'Meow-Meow': राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2021) सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपा (BJP) काहीसा आक्रमक पाहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरुन आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज (23 डिसेंबर) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजीही झाली. दरम्यान, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) विधिमंडळात दाखल होताना पायऱ्यांवर बसलेल्या नितेश राणे (Nitesh Rane) यांनी 'म्याऊ.. म्याऊ' (Meow-Meow) अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे या घोषणा देताना स्वत: हसत होते. तसेच, इतर भाजप नेतेसुद्धा हसत होते. त्यामुळे एखाद्या मंत्र्याचे आगमन होताना एखाद्या आमदाराने अशा घोषणा देणे आणि कितपत योग्य आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षांच्या नेत्यांसह आमदारांनी जोरदा घोषणाबाजी केली. या वेळी 'काय म्हणाले दादा, ठाकरे सरकार शोधून आणा..!' अशी घोषणा विरोधी पक्षाचे आमदार देत होते. ही घोषणाबाजी सुरु असतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत निघाले असता त्यांना पाहून नितेश राणे यांनी 'म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ...' असे म्हणत घोषणा देण्यास सुरुवात केली. नितेश राणे या घोषणा देताना स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याकडून 'त्या' विधानाबाबत माफी; वादावरही पडदा)

दरम्यान, आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवरुन बोलताना नितेश राणे यांनी म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांना धमकी देण्यासारखे काय आहे. धमकी देण्यासारखे त्यांनी काय केले आहे. त्यांना कोणत्या आवाजात धमक्या आल्या. त्यांनी रात्री 7 आणि 8 नंतरच्या बैठका बंद कराव्यात म्हणजे धमक्या येणे बंद होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत पोलिसांनी सांगितले की, आदित्या ठाकरे यांना पहिल्यांदा व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. या मॅसेजला त्यांनी रिप्लायदिला नाही. त्यानंतर आरोपीने दुरध्वनीवरुन ठाकरे यांना तीन वेळा कॉल केला. मात्र, तो कॉलही ठाकरे यांनी स्वीकारला नाही. त्यानंतर आरोपीने ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचेही या आरोपीने मेसेजमध्ये म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.