Maharashtra Winter Session 2021: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याकडून 'त्या' विधानाबाबत माफी; वादावरही पडदा
Bhaskar Jadhav | (Photo Credit: Maharashtra Legislature)

शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत पंतप्रधा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची केलेली नक्कल आणि केलेले हावभाव मागे घेत माफी मागितली आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नक्कल करत नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या विधानाचा उल्लेख केला होता. यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार आक्षेप घेत जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी केली. जाधव यांच्या विधानावर गदारोळ झाल्याने सभागृह तहकूब करावे लागले. आक्रमक भाजपने विधिमंडळात जोरदार निशेध नोंदवला. अखेर विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरुन भास्कर जाधव यांनी माफी मागितली.

भास्कर जाधव सभागृहात म्हणाले की, 'माझ्या बोलण्याच्या वेळी नकळत हातवारे होतात. मी नक्कल केली. मात्र, मी असंसदीय शब्द उच्चारलेले नाहीत. ' अध्यक्ष महोदय मी आपल्या सूचनेनुसार माफी मागतो असेही जाधव यांनी म्हटले. दरम्यान, आपण माफी मागूनही जर विरोधी पक्षनेत्यांना हक्कभंग प्रस्ताव आणायचा असेल तर त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी असल्याचे जाधव यांनी म्हटले. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: भास्कर जाधव यांच्याकडून नरेंद्र मोदी यांची नक्कल, देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप, निलंबनाचीही मागणी; विधिमंडळात खडाजंगी (Video))

काय घडले नेमके?

विधिमंडळाच्या विधनसभा सभागृहात राज्यातील वीज जोडणी कापण्यासंदर्भातील धोरणावर चर्चा सुरु होती. या वेळी उर्जामंत्री नितीन राऊत बोलत होते. बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिला. नितीन राऊत यांनी म्हटले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले होते की, प्रत्येकाच्या खात्यात 50 लाख जमा करणार पण ते काही केलेच नाही.' यावर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन राऊत यांच्या विधानावर आक्षेप घेत आव्हान दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'नितीन राऊत यांनी पंतप्रधानांचे हे विधान घेऊन यावे किंवा त्यांनी देशाची माफी मागावी', असे आव्हान फडणवीस यांनी राऊत यांना दिले. तसेच, 'वाट्टेल ते बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही तुमच्या नेत्यांबाबत बोलू का?' असे म्हणत राऊत यांचे विधान कामकाजातून काढावे अशी मागणीही अध्यक्षांकडे केली.

यावर नितनी राऊत यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विदेशातील काळा पैसा भारतात आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा केल्याचे म्हटले होते, असे सांगितले. यावरही आक्षेप घेत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी असे म्हटलेच नसल्याचे सांगितले.

या चर्चेदरम्यान, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसेच, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 100 वेळा हे वाक्य बोलले आहेत. ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का' असे ते बोलले आहेत असे सांगत भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केली. यावर फडणवीसांनी आक्षेप घेतला.