Maharashtra Winter Session 2021: भास्कर जाधव यांच्याकडून नरेंद्र मोदी यांची नक्कल, देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप, निलंबनाचीही मागणी; विधिमंडळात खडाजंगी (Video)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव यांच्यात हिवाळी अधिवेश (Maharashtra Winter Session 2021) आज (22 डिसेंबर) चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नक्कल केली. याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार आक्षेप घेतला.

Maharashtra Winter Session 2021: भास्कर जाधव यांच्याकडून नरेंद्र मोदी यांची नक्कल, देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप, निलंबनाचीही मागणी; विधिमंडळात खडाजंगी (Video)
Bhaskar Jadhav, Devendra Fadnavis | (Photo Credit: Maharashtra Legislature)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव यांच्यात हिवाळी अधिवेश (Maharashtra Winter Session 2021) आज (22 डिसेंबर) चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नक्कल केली. याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार आक्षेप घेतला. तसेच, पंतप्रधानांची नक्कल करणे सभागृहात चालणार आहे का? असा सवाल विचारत भास्कर जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. संसद आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी हिवाळी अधिवेशनात निलंबनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. संसदेत खासदारांच्या निलंबनावरुन विरोधक आक्रमक आहेत. तर महाराष्ट्रात आमदारांच्या निलंबनावरुन विरोधक आक्रमक आहेत. महाराष्ट्रात जे विरोधात आहेत ते दिल्लीत सत्तेत आहेत. दिल्लीत जे विरोधक आहेत ते महाराष्ट्रात सत्तेत आहेत.

काय घडले नेमके?

विधिमंडळाच्या विधनसभा सभागृहात राज्यातील वीज जोडणी कापण्यासंदर्भातील धोरणावर चर्चा सुरु होती. या वेळी उर्जामंत्री नितीन राऊत बोलत होते. बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिला. नितीन राऊत यांनी म्हटले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले होते की, प्रत्येकाच्या खात्यात 50 लाख जमा करणार पण ते काही केलेच नाही.' यावर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन राऊत यांच्या विधानावर आक्षेप घेत आव्हान दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'नितीन राऊत यांनी पंतप्रधानांचे हे विधान घेऊन यावे किंवा त्यांनी देशाची माफी मागावी', असे आव्हान फडणवीस यांनी राऊत यांना दिले. तसेच, 'वाट्टेल ते बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही तुमच्या नेत्यांबाबत बोलू का?' असे म्हणत राऊत यांचे विधान कामकाजातून काढावे अशी मागणीही अध्यक्षांकडे केली. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु, सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार संघर्षाची शक्यता)

व्हिडिओ

यावर नितनी राऊत यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विदेशातील काळा पैसा भारतात आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा केल्याचे म्हटले होते, असे सांगितले. यावरही आक्षेप घेत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी असे म्हटलेच नसल्याचे सांगितले.

व्हिडिओ

या चर्चेदरम्यान, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसेच, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 100 वेळा हे वाक्य बोलले आहेत. ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का' असे ते बोलले आहेत असे सांगत भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केली. यावर फडणवीसांनी आक्षेप घेतला.

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2021 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).