Maharashtra Weather Update: राज्यात तामपानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. सकाळच्या वेळेस उन्हाच्या झळा बसत असून रात्री थोडा गारवा असे वातावरण काही जिल्ह्यात दिसून आले आहे. अशातच हिंगोलीसह अन्य भागात चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून आले आहे. तसेच तेथे उन्हाच्या झळा सुद्धा कमी बसत आहेत. प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचसोबत वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
येत्या चार-पाच दिवसात तापमानात वाढ होण्याची शत्यता आहे. तर 7-8 मार्चला ढगाळ वातावरण राहणार आहे. 8 मार्चला औरंगाबाद, परभणी, जालना, बीड आणि हिंगोलीत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.(पुण्यात लोणी काळभोर मध्ये septic tank साफ करताना 4 जणांचा गुदमरून मृत्यू)
दरम्यान, राज्यात येणाऱ्या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत हिंगोलीत हरभरा, गहू याची कापणी केली जात आहे. तर काही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक काढले असून ते वाळण्यास टाकले आहे. पण हवामान विभागाने आता व्यक्त केलेल्या वातारवणाच्या स्थितीमुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.