Cold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाह वाढल्यामुळे राज्यात थंडी (Onset Of Cold) जाणवू लागली आहे. राज्यातील तापमानात (Temperature In the Maharashtra) काहीशी घट झाली आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Maharashtra Weather Forecast) आहे. दक्षिण भारतात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राज्यात शुक्रवार ते रविवार या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला अंदाज

शुक्रवार- कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पाऊस

शनिवार- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातूर तुरळक पाऊस

रविवार- राज्यात इतर ठिकाणी तुरळक पाऊस (आला थंडीचा महिना, त्वचा सांभाळा; या साध्या Winter Skin Care Tips वापरा आणि रहा हेल्दी)

राज्यातील अद्ययावत तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

जळगाव- 11

पुणे- 11.8

अमरावती- 12.6

गोंदिया- 12.6

नाशिक- 12.7

औरंगाबाद- 12.8

सोलापूर- 13.1

बीड- 13.1

परभणी- 13.2

नागपूर- 13,2

महाबळेश्वर- 13.5

वर्धा- 13.8

वाशिम- 14

नगर- 14.1

अकोला- 14.8

सातारा- 15.9

नांदेड- 16

सांगली- 16.2

कोल्हापूर- 17.7

राज्यात या आठवड्यात गारठा कायम होता. हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र आज (11 नोव्हेंबर) हळूहळू तामिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकेल. या कालावधीत या क्षेत्राची तीव्रता कायम राहणार आहे. हे क्षेत्र तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीलगतच्या करायकल व श्रीहरी कोटा दरम्यान विसावा घेऊन थांबेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.