महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस सर्वत्रच धुमाकूळ घालत आहे. अशामध्ये मुंबई हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज (19 ऑक्टोबर) महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेल्या रत्नागिरी (Ratnagiri, सिंधुदुर्ग (Sindhudurg) भागात वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यापावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी, शेतकर्यांनी सावध राहणं गरजेचे आहे. मागील आठवड्याभरापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस तुफान कोसळत असल्याने शेतकर्यांचं पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे किमान जीवितहानी रोखण्यासाठी राज्यभर यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहे. Maharashtra Heavy Rains Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा, 'या' तारखेला मेघगर्जनेसह राज्यात पाऊस बरसण्याची शक्यता.
महाराष्ट्रात यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वदूर पाऊस बरसत असल्याने ओढ्यांनाही नदीचे स्वरूप आले आहे. रस्ते खचले आहेत. अनेक दुर्गम भागात लोकांचा संपर्क पूरामुळे तुटला आहे. कोकणात भात शेतीचं प्रामुख्याने नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या काळात सामान्यांसह मच्छिमार बांधवांनी देखील समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ANI Tweet
Heavy rainfall/thunderstorm likely in South Konkan area today; thunderstorm accompanied with lightning & rain likely at isolated places in Ratnagiri & Sindhudurg today: IMD Mumbai. #Maharashtra
— ANI (@ANI) October 19, 2020
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 20, 21 आणि 22 तारखेला महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. महाराष्ट्राला परतीचा पाऊस झोडपून काढत आहे. सध्या यामुळे होणार्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीमधील मंत्री, नेते रस्त्यावर उतरले आहे. कोकणाला यंदा मान्सूनच्या सुरूवातीच्या टप्प्यावर निसर्ग चक्रीवादळानेही झोडपलं आहे.