Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात
Maharashtra Elections (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रामध्ये आज (1 डिसेंबर) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 5 जागांवर निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात आज  पुणे, औरंगाबाद्,नागपूर मधील पदवीधर तर अमतरावती सोलापूर भागात शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यात शिक्षक,पदवीधर मतदारसंघात  3 पदवीधर तर एका शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. विधानसभेनंतर राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीची महाविकास आघाडी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या या विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे. दरम्यान या निवडणूकीचा निकाल 3 डिसेंबर दिवशी आहे.

भाजपाने पुणे मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन रामदास धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, नागपूर मध्ये कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी, पुण्यात कॉंग्रेसचे जयंत आसनगावकर, मनसेच्या रूपाली पाटील या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. Maharashtra MLC Election 2020: महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व पक्षांतील उमेदवारांची नावे जाहीर, येथे पाहा पूर्ण यादी.

महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. यामध्ये 31 सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते. उर्वरित 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात.