महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील कोरोना विषाणू लसीकरणासंदर्भात (Covid-19 Vaccination) एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘राज्यात लसीचा तुटवडा आहे आणि पुरवठा वेगही मंदावला आहे, यामुळे सरकारने 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम थांबवली आहे.’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, जूनमध्ये लसीचा पुरवठा सुरू होईल व त्यानंतर राज्यात लसीकरण मोहिमेला वेग येईल, अशी त्यांना आशा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बालरोग तज्ज्ञांशी झालेल्या संभाषणात याबाबत माहिती दिली.
आज मुंबईतील सर्व लस केंद्रे बंद आहेत. याबाबत बीएमसीने ट्वीटद्वारे माहिती दिली होती. महाराष्ट्रात सरकार लसींच्या कमतरतेबाबत केंद्र सरकारकडे सतत तक्रार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील बालरोग तज्ञांशी बोलताना लसीकरणाबाबत माहिती दिली. जूनमध्ये लसींचा पुरवठा होईल व त्यावेळी 18-44 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु होईल असा अंदाज वर्तवला आहे. आज सीएम ठाकरे म्हणाले, राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी 18-44 वयोगटातील सहा कोटी लाभार्थ्यांना 12 कोटी डोस देण्यासाठी, सरकार एकाचेवेळी संपूर्ण पेमेंट करण्यास तयार आहे.
ते पुढे म्हणाले, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसला, दुसर्या लाटेने तरुणांना लक्ष्य केले आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना धोका आहे. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी व त्यासबंधी आरोग्य सुविधा उभारण्याची तयारी सुरु झाली आहे.’ उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे अनेकदा म्हणाले आहेत की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. देशात कोरोनाव्हायरस संसर्गाची तिसरी लाट ही मुलांसाठी घातक ठरू शकते असे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिरिक्त व्यवस्था केली जात आहे. (हेही वाचा: Cyclone Tauktae: 'कर्ज घ्या पण नुकसानग्रस्तांना मदत करा'; नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन)
दरम्यान, धारावीसारख्या दाट वस्ती असलेल्या भागातही कोरोना संसर्गाला गती कमी झाली आहे, ज्याचे देशभर कौतुक झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की तिसऱ्या लाटेत कोणालाही ऑक्सिजनसाठी भटकावे लागू नये म्हणून, राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढविण्याचे काम सुरू झाले आहे.