Ratnagiri Fire: लोटे एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीत 3 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, 7 गंभीर जखमी
Representational Image (Photo Credits: IANS|Representational Image)

रत्नागिरीतील (Ratnagiri) लोटे एमआयडीसी (Lote MIDC) मधील मधील प्लॉट नंबर 15 येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी वाजताच्या सुमारास घडली आहे. या आगीत 3 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या कंपनीतील इसलॅशम प्लान्टमध्ये अति ज्वलनाग्राही सॉल्व्हन्ट केमिकल असलेल्या रिअ‍ॅक्टरचे अचानक टेम्प्रेचर वाढल्यामुळे स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग लागली तेव्हा एकूण 9 कर्मचारी कंपनीत होते. यापैकी 6 कर्मचारी भाजलेल्या अवस्थेत कंपनीबाहेर पडले. मात्र, तीन कर्मचारी त्या ठिकाणी अडकून पडले. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, मदतकार्य करणाऱ्या एका व्यक्तीसह परवेज आलम, ओंकार साळवी, रामचंद्र बहुतुले, विश्वास शिंदे, विलास खरावत, निलेश आखाडे या सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. हे देखील वाचा- बारामती मध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या 4 जणांना अटक

याआधी खेड येथील लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा फाईन्स कंपनीत 13 जानेवारी 2020 ला आग लागण्याची घटना घडली होती. त्यावेळी या ठिकाणी मोठा स्फोट झाल्याने आग लागली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.