Maharashtra State Weekly Lottery Results: महाराष्ट्र राज्य लॉटरीची सोडत जाहीर; तुमच्याकडे तर नाहीत ना 'हे' नंबर्स, lottery.maharashtra.gov.in वर पहा निकालांची संपूर्ण यादी
Maharashtra State Lottery Results

Maharashtra State Weekly Lottery Results: लॉटरीद्वारे कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून लोकांना आपली स्वप्ने साकार करण्याची संधी मिळते. महाराष्ट्र सरकारकडूनही वेळोवेळी लॉटरीची सोडत काढली जाते. महाराष्‍ट्र शासन तीन राष्‍ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते. नुकतेच एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यातील तीन वेगवेगळ्या दिवशीच्या लॉटरीच्या सोडती वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहेत.

काल म्हणजेच 4 एप्रिल रोजी गणेशलक्ष्मी गाैरव साप्ताहिक सोडत, महा. गजलक्ष्मी गुरू साप्ताहिक सोडत, महा. सहृयाद्री दिपलक्ष्मी गुरूवार सोडत आणि आकर्षक पुष्कराज साप्ताहिक सोडतिचा निकाल जाहीर झाला. तुम्ही lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर हा निकात पाहू शकता. महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित याच वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो.

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल? 

  • सर्वात आधी lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे उघडलेल्या पेजवरील 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणे तुम्ही ज्या लॉटरीचे तिकीट काढले आहे, त्यावर क्लिक करा.
  • एक पीडीएफ स्वरूपातील निकालांची फाईल ओपन होईल.
  • या पीडीएफमधील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्या तिकिटाचा क्रमांक तुम्हाला दिसेल.

अशी प्राप्त करा बक्षिसाची रक्कम-

जर तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस लागले असेल, तर ती रक्कम ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येते. मात्र दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक (वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी लागते. महत्वाचे म्हणजे सोडतीच्या दिनांकानंतर 90 दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे. (हेही वाचा: Electricity Price Increase: महावितरणकडून वीजदरवाढ; आजपासून नवे दर लागू)

दरम्यान, महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. समाजातील मटका व जुगार ह्या व्यसनांना प्रतिबंध घालून, त्यातून होणारी जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी, राज्याच्या वित्त‍ विभागाने ह्या लॉटरीची सुरुवात केली. या लॉटरीमुळे गेल्या 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती आणि 5 करोडपती झाल्या आहेत.