Maharashtra ST Bus To Ayodhya : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या(Lord Ram) भक्य मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर देशभरातून राम भक्त अयोद्धेत दाखल होत आहेत. अयोद्धेला जाण्यासाठी भाविक खासगी वाहनांना पसंती देत आहेत. हे पाहून आता राज्य परिवहन महामंडळाने देखील एसटी बस(ST Bus) सुरू करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात ST बस आता थेट अयोध्येला जाणार आहे. एसटी महामंडळातर्फे अयोध्येसाठी (Ayodhya Ram Mandir) बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या आधी धुळ्यातून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता पुण्यातून देखील ही सेवा सुरु करण्यात योणार आहे.(हेही वाचा : MSRTC Mumbai-Alandi Bus Service: मुंबई ते आळंदी बससेवा सुरू; माऊलींच्या भक्तांसाठी MSRTC ची खास भेट; जाणून घ्या वेळापत्रक, मार्ग)
अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर बांधण्यात आले आहे. देशभरातून भाविक अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. विविध राज्यातून अयोध्येकरिता खास रेल्वे ट्रेन देखील सोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही आता रेल्वेसह एसटी बस सेवा अयोध्येकरिता देखील सुरु करण्यात येत आहे. यात तुम्ही ग्रुपसाठी बुकींग करू शकता. त्यामुळे संपूर्ण एसटी बस चालकासह तुम्हाला मिळू शकते. यात 45 ते 55 जणांचा एक समूह एकत्र प्रवास करत असेल तर एसटीबस सोडली जाणार आहे. 50 जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आणि मागणीनुसार एसटीची पाहिजे ती बस मिळू शकते. अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रती किलोमिटर 56 रुपये भाडे आकारले जाईल. त्याशिवाय, या यात्रेच्या दरम्यान 3 ते 4 मुक्काम असणार आहेत. यामुळे 2 ते 3 चालक या बससाठी दिले जातील असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (हेही वाचा : Free ST Bus Service: ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! आता 75 वर्षांवरील नागरिकांना ST ने मोफत प्रवास करता येणार; 'या' लोकांनाही मिळणार 50 टक्के सूट)
धुळ्यातून अयोध्येसाठी राज्यात परिवहन महामंडळाची पहिली बस सुरु झाली. या बसने 1600 किलोमीटरचा प्रवास केला. परिवहन महामंडळाने प्रवाशांकडून 4 हजार भाडे आकारले. या बसमध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यात आल्या. त्याशिवाय, 2 चालक, परिवहनचे 2 अधिकारी बसमध्ये होते.