Maharashtra: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे असे वारंवार सांगितले जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता रायगड येथील एका बसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओ मध्ये असे दिसून येत आहे की, रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेला असला तरीही एसटी बस चालक प्रवाशांना घेऊन पुढे जात आहे. या प्रकरणी एसटी बस चालकासह त्याच्या वाहकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहेय
मुसळधार पावसामुळे नारेश्वरी बंधारा पाण्याखाली गेला आणि पाणी सुद्धा त्यामुळे ओव्हरफ्लो होत तेथे असणारा रस्ता त्यााखाली गेला. मात्र तेथून जाणाऱ्या एसटी चालकाने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती तरीही त्याने त्यामधून बस पुढे काढली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होत त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्याच्या परिवहन विभाग नियंत्र अनघा बारटक्के यांनी बसच्या चालकांसह वाहक यांचे निलंबन केल्याचे म्हटले आहे.(मुंबईतील Gateway Of India येथील समुद्रात पडलेल्या महिलेला रेस्कू केल्याचा थरारक अनुभव फोटोग्राफरने केला शेअर)
Tweet:
Video | Raigad | एसटी ड्रायव्हरने थेट पुराच्या पाण्यात बस घातली, महाडच्या रेवतळे फाटा येथील घटना#Raigad #Mahad #Rain #ST_Bus #ST
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा - https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/c6W3pIETOa
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 13, 2021
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी पर्जन्यवृष्टीस पुरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि परिसरात पर्जन्यवृष्टी होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातही पुढचे चार-पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. तर विदर्भात पावसाच्या तुरळक सरी पडताना दिसतील.