
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता दहावी (Maharashtra SSC Result 2025) आणि बारावी (Maharashtra HSC Result 2025) परीक्षांचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर करु शकते. दरम्यान, सांगितले जात आहे की, यंदाच्या वर्षी हे निकाल जाहीर व्हायला इतकाही वेळ लागणार नाही. त्या उलट हे निकाल कदाचित 10 मे 2025 पर्यंत जाहीर केले जाऊ शकतात. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शैक्षणीक वर्तुळातील घटक हे निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर पडताळणीसाठी परिक्षार्थीचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करून त्यांचे निकाल पाहू शकतात.
इयत्ता 12वी निकाल: प्रमुख मुद्दे
- महाराष्ट्र मंडळाने 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यातील अनेक केंद्रांवर बारावीच्या परीक्षा घेतल्या.
- यापूर्वी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
- ऑनलाइन निकालात लेखी (Theory) आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचे विषयवार गुण प्रदर्शित केले जातील.
निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: mahresult.nic.in
- 'HSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा बारावीचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव एंटर करा.
- तुमचे गुण पाहण्यासाठी 'GET RESULT' वर क्लिक करा.
- भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.
महाराष्ट्र इयत्ता 10वी, 12 परीक्षा श्रेणी पद्धती
महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी-आधारित श्रेणी पद्धतीचे अनुसरण करते. या श्रेणी खालीलप्रमाणे:
गुणांची श्रेणी
- 75% आणि त्याहून अधिक फरक
- प्रथम श्रेणी 60% आणि त्याहून अधिक
- द्वितीय श्रेणी 45% ते 59%
- उत्तीर्ण 35% ते44%
- 35% पेक्षा कमी अनुत्तीर्ण
दरम्यान, इयत्ता बारावीप्रमाणेच आपण mahresult.nic.in वर जाऊन इयत्ता दहावीचे गुणपत्रकही (निकाल जाहीर झाल्यानंतर) मिळवू शकता. या वेबसाईटवर जाऊन 'SSC Examination Result 2025' वर क्लिक करा आणि इतर प्रक्रिया जशीच्या तशी वापरा. आपले गुणपत्र आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळू शकेल.