Maharashtra Shocker: अल्पवयीन मुलीसोबत अफेअर असल्याने तरुणाची हत्या
Representational Image | (Photo Credits: PTI)

Maharashtra Shocker: महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलीसोबत अफेअर असल्याच्या कारणास्तव एका 18 वर्षीय तरुणाची बुधवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. कोल्हापूर मधील पन्हाळा तालुक्यात ही घटना घडली असून ज्यावेळी मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी जात होता त्याच वेळी त्याची हत्या केली गेली. या प्रकरणी तरुणाच्या मित्रांकडून तक्रार करण्यासह अल्पवयीन मुलीशी संबंधित असलेल्या 7 जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत अफेअर होते. मात्र तिच्या घरातील मंडळींना तिचे हे अफेअर मान्य नव्हते. या दोघांनी मार्च महिन्यात पळ सुद्धा काढला होता. मात्र काही दिवसातच ते परत आले. तर टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या बातमीनुसार, मुलीच्या परिवाराने तक्रार केली की मुलगा तिला शिविगाळ करत असे. त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.

बुधवारी रात्री तरुण आणि त्याचे मित्र घरी परतत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले की, हल्लेखोराने लोखंडी आणि लाकडाच्या काठ्यांसह धारधार शस्राने हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर मित्राला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याला मृत घोषित केले.(Pune: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल)

हल्लेखोराची ओळख पटली असून यामागे नेमका कोणचा हात आहे हे शोधून काढले जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. तरुणाच्या परिवाराने त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी असे म्हटले की, आरोपीला आधी अटक करा. मात्र जेव्हा त्यांना नेमका घडलेला प्रकार कळला असता त्यांनी त्याचा मृतदेह स्विकारला. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.