पुणे पोलिसांकडून तरुणाला चोप (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. या लॉकडाउनचा फटका कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे सरकारने कामगार वर्गासाठी राज्यातच राहण्याची सोय करुन देत मोठ्या प्रमाणात शेल्टर होम उभारले आहेत. यामध्ये स्थलांतरित कामगारांना त्यांच्या परिवारासोबत राहता येणार आहे. याच पार्श्वभुमीवर पुण्यतील कोथरुड मध्ये ऑनड्युटी पोलिसांवर थुंकणाऱ्या तरुणाला पोलिसांनीच चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अमित कुमार असे तरुणाचे नाव असून तो शेल्टर होम मधून पळाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले असता त्याने त्यांना शिवीगाळ करत थुंकल्याचे पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली आहे.

शेल्टर होम मधून पळ काढणाऱ्या अमितने असे म्हटले आहे की, त्याला तेथे रहायचे नाही. कारण दारु, तांबाखू आणि सिगरेट मिळत नसल्यामुळे त्याने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्या दोघांत वाद होत त्याने पोलिसांवर थुंकल्याचा प्रकार कोथरुड येथे रविवारी घडला आहे. तसेच शेल्टर होमच्या येथे लघवी करत असल्याच्या तक्रारी सुद्धा काहींनी त्याच्या विरोधात केल्या आहेत. या प्रकरणी अमित याला पोलिसांकडून शिक्षा करण्यात आली.(Lockdown: लॉकडाऊन हटविण्यात आला नाही, रुतलेल्या अर्थचक्राला बाहेर काढण्यासाठी नवी सुरुवात: उद्धव ठाकरे)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. तर महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच राज्यात लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. मात्र आजपासून उद्योगधंद्यांना काम करण्यासाठी परवानगी राज्य शासनाकडून देण्यात आली आहे.