Anil Deshmukh and Maharashtra Police Logo (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  वाढता फैलाव रोखण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सोबतच महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सुद्धा अहोरात्र मेहनत करत आहेत परिणामी पोलीस दलावर कामाचा तणाव येत आहे, अशातच 25 मे रोजी रमजान ईद (Ramzan Eid) हा महत्वाचा आणि गर्दीचा सण सुद्धा साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस दलाला सज्ज ठेवायचे आहे त्यांच्यासोबतच या कामात मदतीसाठी राज्यात अतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CPF) निदान 20 टीम सुद्धा रुजू करण्यात याव्यात अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी माहिती दिली. Coronavirus Update: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत?

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या अनेक पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे मागील काही दिवसात समोर आले आहे. दुसरीकडे कोरोनामुळे कामकाजाचे तास वाढले आहेत. अशावेळी तणाव कमी करता येईल अशा दृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी राज्याने केंद्राला सीएपीएफ तैनात करावे. मुंबई: शिवडी पोलीस स्टेशन येथील ASI मुरलीधर वाघमारे यांचा COVID 19 विरूद्ध लढताना मृत्यू

ANI ट्विट

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मुंबईमध्ये मागील काही दिवसांत 5 तर महाराष्ट्र राज्यात 8 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या 50-55 वर्षातील पोलिसांना बंदोबस्तासाठी न बोलवण्याचा निर्णय पोलिस खात्याकडून घेण्यात आला आहे. राज्यात 450 पेक्षा अधिक पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.