Nagpur Suicide News: नागपूरमध्ये नदी उडी मारून एका व्यक्तीची आत्महत्या,गर्लफ्रेंडच्या कुटूंबियाने ब्लेकमेल केल्याप्रकरणी उचलले टोकाचे पाऊल
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Nagpur Suicide News: नागपूर मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्काराचा आरोप करून ब्लॅकमेल केले जात असल्याचा दावा करत ३८ वर्षीय व्यक्तीने नदीत उडी मारून आपलं जीवन संपवले आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने वृत्ताना दिली, नागपूर येथील कळमना भागातील रहिवासी होता. मनीष यादव असे या मृत व्यक्तीचे नाव होते. परिसरातील एका १९ वर्षीय मुली सोबत त्यांचे संबंध होती अशी माहिती पोलीसांच्या हाती लागली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी ६ सप्टेंबर पासून घरातून बेपत्ता झाली होती. मनीष या सर्वांना जबाबदार असल्याचा मुलीच्या कुटूंबियाने दावा केला. पोलीसांत त्यांनी तक्रार देखील केली होती. या संपुर्ण घटने मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रविवारी मनीषने नदीकाठावरून फेसबुकवर एक लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीम केला ज्यात त्याने सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना 5 लाख रुपये न दिल्यास बनावट बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती आणि त्यांनी उत्तर प्रदेशातील इतर कोणाला तरी ब्लॅकमेल केले होते. असह्य दबावाला तोंड देत जीवन संपवत असल्याचे त्यांनी सांगितले. कळमना पोलिसांनी मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.