Voting | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Maharashtra Municipal Corporation, Zilla Parishad & Panchayat Samiti Bye Election 2019: लोकसभा निवडणूक 2019 संपल्यावर आता महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणूक 2019 चे. विधानसभा निवडणुकीस काही महिन्यांचा अवधी आहे. दरम्यान, मधल्या काळात राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 जून रोजी मतदान पार पडत आहे. लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

पोटनिवडणूक होत असलेल्या महापालिका

नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी आणि चंद्रपूर अशा एकूण नऊ महापालिकांमधील 15 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदा

महापालिका निवडणुकीसोबतच राज्यात रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या सात जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या सात जिल्हा परिषदांमध्ये एकूण 9 जागा रिक्त आहेत. या जगांसाठी पोटनिवडणूक पार पडत आहे.

16 पंचायत समित्यांमध्येही पोटनिवडणूक

दरम्यान, महापालिका, जिल्हा परिषदांसोबतच राज्यातील विविध 16 पंचायत समित्यांमध्येही पोटनिवडणूक पार पडत आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या 23 जून रोजी या महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडणार आहे. तर, त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जून रोजी मतोजणी पार पडणार आहे. (हेही वाचा, Cooperative Societies Election 2019: राज्यात सहकारी संस्था निवडणूक 1 जूनपासून)

कसा असेल मतदान कार्यक्रम?

23 मे 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ.

23 मे 2019 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मतदान प्रक्रिया थांबविण्यात येईल.

कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या वॉर्ड/प्रभागात मतदान

जळगाव-जामोद (बुलढाणा) - 8 अ, दारव्हा (यवतमाळ) - 2 अ, मोहाडी (भंडारा) - 4,9,12, लाखांदूर

(भंडारा)-16, देवरी (गोंदीया) - 11, कोरपना (चंद्रपूर)- 15, मूल (चंद्रपूर) -6 अ, भआमरागड (गडचिरोली) - 5, भामरागड (गडचिरोली) - 16 आदि नगरपरिदांच्या रिक्त जागांवरही याच दिवशी मतदान पार पडत आहे. सोबतच नागपूर येथील नवनिर्मित बुटीबोरी नगरपरिषदेसाठीही 23 जून रोजीच निवडणूक पार पडत आहे.

कोणत्या जिल्हा परिषदेत कोठे मतदान?

चंद्रपूर महानगरपालिका (6 ब आणि 13 ब), वर्धा झडशी (सेलू), मडगाव (समुद्रपूर), भंडारा ब्राम्ही (पवनी) पालांदपूर (लाखनी), गोंदिया आसोली या जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणू पार पडणार आहे.

दरम्यान, गोरेगाव (गोंदिया) घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा, हगणघाट (वर्धा)- वडनेर या पंचायत समिती गणात निवडणूक पार पडत आहे.

कसा पार पडला  निवडणूक कार्यक्रम

दरम्यान, या निवडणुकांसाठी 30 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्रं दाखल करण्यात आली. 2 व 5 जून 2019 रोजी सरकारी सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रं स्वीकारण्यात आली नव्हती. 7 जून 2019 रोजी निवडणूक आयोगाला प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. तर 10 जून 2019 या तारखेपर्यंत आपली नामनिर्देशन पत्रं मागे घेण्याची मुभा होती. नामनिर्देशनपत्रं कायम ठेवलेल्या उमेदवारांना 11 जून 2019 रोजी निवडणुकीसाठी निवडणूक चिन्हं नेमून देण्यात आली.