Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
33 minutes ago
Live

Maharashtra Municipal Coporation, Zilla Parishad & Panchayat Samiti By Election 2019 Results Live Updates: महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक 2019 निकाल लाईव्ह अपडेट

News अण्णासाहेब चवरे | Jun 24, 2019 02:03 PM IST
A+
A-
24 Jun, 14:03 (IST)
  • उल्हासनगर महानगर पालिका पोटनिवडणूक 2019 1(ब) अंतिम निकाल
  • मंगल वाघे (रिपाई आठवले गट) - 2643
  • वनिता भोईर(भाजप, शिवसेना, साई) - 2270
  • रिपाई आठवले गटाचे मंगल वाघे हे 373 मतांनी विजयी.
24 Jun, 11:51 (IST)

इंदापूर: पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजयी झाल्या आहेत.

24 Jun, 11:47 (IST)

 

मालेगाव महापालिका पोटनिवडणूक 2019: काँग्रेस उमेदवार फैमद कुरेशी (Fehmida Farooq Qureshi) मालेगाव येथून विजयी झाले आहेत.

24 Jun, 11:47 (IST)

 

मालेगाव महापालिका पोटनिवडणूक 2019: काँग्रेस उमेदवार फैमद कुरेशी (Fehmida Farooq Qureshi) मालेगाव येथून विजयी झाले आहेत.

24 Jun, 11:40 (IST)

मूल नगरपरिषद पोटनिवडणूक: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपला रोखण्यात काँग्रेस यशस्वी झाला. या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांचा विजय झाला. ललिता फुलझेले यांनी शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी आघाडी घेत पराभव केला.

24 Jun, 11:36 (IST)

शिर्डी: संगमनेर नगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे. राजेंद्र वाकचौरे असे या उमेदवाराचे नाव असून, त्यांनी 711 मतांनी विजय मिळवला.

24 Jun, 11:28 (IST)

परभणी- मानवत न.प.नगराध्यपद निवडणूकीत भाजप-शिवसेना आघाडीचे प्रा एस एन पाटील यांचा विजय तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी च्या पुजा खरात यांचा दारुण पराभव झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. भाजपचे एस एन पाटील हे तब्बल 9 हजार मतांनी  विजयी झाल्याचे समजते.

24 Jun, 10:42 (IST)

मालेगावर महापालिका निवडणुकीत एका जागेवर रिजवान नावाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर, काँग्रेस उमेदवार फारुक कुरेशी हे काहीसे पिछाडीवर आहेत.

24 Jun, 10:06 (IST)

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक मतमोजणीस सुरुवात झाली असून, सर्वांनाच अंतिम निकालाची प्रतिक्षा आहे. अपवाद वगळता जवळपास सर्वच निवडणुका या EVM द्वारे पार पडल्यामुळे दुपारी 11 ते एक वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणे अपेक्षित आहे. 

24 Jun, 09:55 (IST)

महापालिका, जिल्हा परिषदांसोबतच राज्यातील विविध 16 पंचायत समित्यांमध्येही पोटनिवडणूक पार पडली. 

Load More

Maharashtra Municipal Coporation, ZP & Panchayat Samiti By Election 2019 Results Live Updates: राज्यात विविध महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (24 जून 2019)) पार पडत आहे. या महापालिका, जिल्हा परिषदा अथवा पंचायत समित्यांची संख्या अधिक नसली तरी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर या निवडणुकांचा निकाल जनमताचा प्रथमिक कल म्हणून महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे इथे आम्ही या मतमोजणीचे लाइव्ह अपडेट देत आहोत. त्यामुळे हे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहू शकता.


Show Full Article Share Now