Rains. | Representational Image. (Photo Credit: PTI)

Maharashtra Monsoon Updates: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. त्याचसोबत काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे वॉटरलॉगिंग होत जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्रात पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि नॉर्थ कोकणात पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार आहे. याबद्दल आयएमडी यांनी अधिक माहिती दिली आहे.(Konkan Monsoon Update: कोकणात येत्या 29 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता- IMD)

राज्यात जून ते 17 ऑगस्ट दरम्यान, 826.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचसोबत जून ते आतापर्यंत सामान्यपणाच्या स्वरुपापेक्षा 16 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षात मॉन्सून मध्ये याच कालावधीत 713.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. आयएमडी यांनी असे म्हटले होते की, राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 1 जून नंतर पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले आहे. तर यवतमाळ, गोंदिया आणि अकोल्यात कमी पावसाची नोंद करण्यात आल आहे.

तसेच मुंबईत येत्या 31 ऑगस्ट पर्यंत ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यात IMD यांनी व्यक्त केली आहे.(Mumbai Rains: मुंंबईत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुढील काही दिवस पाऊस घेणार विश्रांंती- IMD)

दरम्यान, कोकणात सुद्धा या वर्षात पावसाने चांगलाचा धुमाकूळ घातला असून अनेक नद्यांना पूर आला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात देखील समाधानकारक अशा पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 29 ऑगस्टला कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.