Mumbai Monsoon Update: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन मुंंबई मध्ये हाहाकार माजवत बरसणारा पाउस (Mumbai Rains) आता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काहीशी विश्रांंती घेणार आहे. हवामान खात्याचे उपमहासंंचालक के.एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांंच्या माहितीनुसार कालपासुन मुंंबई व उपनगरात बर्याच दिवसाने उजाडलेले पाहायला मिळाले, हीच परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असुन साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत पावसाची चिन्हे मुंंबईत दिसुन येत नाहीयेत. जुलैमध्ये मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पावसाने मुंबईकरांची पार दैना केली. त्यानंतर 10-11 ऑगस्ट पासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला होता, मागच्या आठवड्यापर्यंत हलक्या मध्यम सरी बरसणे कायम होते मात्र आता या आठवड्यात पाउस अगदी कमी होईल असे समजत आहे.
मुंंबई मध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन झालेल्या तुफान पावसामुळे यंंदाचे पाणीकपातीचे संकट मात्र टळताना दिसत आहे. रविवार, 23 ऑगस्ट पर्यंत मुंंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही तलाव व धरण क्षेत्रात 94% पाणी साठा जमा झाला होता, यानुसार लवकरच मुंंबईतील पाणी कपात रद्द केली जाउ शकते.
K. S. Hosalikar ट्विट
After a long break, Mumbai saw Sunshine today and was very pleasant day, with light rains inbetween in City and around.
Mumbai rains are likely to be subdued for couple of days.
Enjoy the Change till end of this month. pic.twitter.com/ubNHZZFpxb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 24, 2020
दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा पुढील काही दिवस पावसाची चिन्हे नाहीत, मान्सून सक्रिय आहे आणि त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेला आहे. परिणामी राजस्थान, दिल्ली, व मुख्यतः उत्तरेकडील राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.