मुंंबई ला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव 94% भरले; पाणी कपातीचा निर्णय लवकरच होणार रद्द
Image For Representation (Photo Credits: ANI)

मुंंबई मध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन तुफान पाउस (Mumbai Rains) सुरु आहे. सुदैवाने यावेळेस केवळ शहरातच नव्हे तर मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सुद्धा चांगला पाउस झाला आहे. यानुसार रविवार,23 ऑगस्ट पर्यंत सात ही तलावात 94 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अतिरिक्त नगरपालिका आयुक्त (हायड्रॉलिक विभाग) पी. वेलरासू (P. Velarasu) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 95 टक्केंची सरासरी गाठल्यावर मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपातही (Water Cut) मागे घेतली जाणार आहे.मुंबईमध्ये यंदा धरणक्षेत्रात जुलै अखेरीपर्यंत पुरेसा पाऊस बरसत नसल्याने 5 ऑगस्ट पासून 20% पाणीकपात लागू केली होती. परंतू काल (23 ऑगस्ट) पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या साठ्यात वाढ झाली आहे. Modak Sagar: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला, वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले

प्राप्त माहितीनुसार, मुंबईला तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि वैतरणा ही तलावं पाणीपुरवठा करतात. यापुर्वी जुलै मध्ये विहार, तुलसी तलाव पुर्ण पणे भरला होता. तर दुसरीकडे, मोडकसागर तलाव परिसरात असलेले वैतरणा धरण पूर्ण भरले आहे. त्या लवकरच तानसा धरणही भरेल असा अंदाज आहे. उर्वरित ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाचे अंदाज आहेत त्यामुळे ही धरणे लवकर भरुन पाण्याची चिंता कमी होउ शकते.

पहा ट्विट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव व धरणात एकूण साठवण क्षमता 14.47 लाख लिटर इतकी आहे. हे तलाव ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत तर त्यांचे पाटबंधारे विभाग नाशिक, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत.