Modak Sagar Dam: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला, वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले
Modak Sagar Dam | (Photo Credits: ANI)

मोडकसागर तलाव पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू ( Modak Sagar Dam Overflow) लागल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता यंदा बऱ्याच प्रमाणात मिटली आहे. मोडकसागर तलाव (Modak Sagar Dam) हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख तलावांपैकी एक आहे. मंगळवारी (18 ऑगस्ट) रात्री 9.15 च्या सुमारास हा तलाव ओव्हरफ्लो झाला. हा तलाव भरल्यामुळे वैतरणा (aitarna Dam) धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यंदा ऐन पावसाळ्यातही मुंबईला पाणीपुरवाठा करणारी धरणे पुरेशा प्रमाणात भरली नव्हती. त्यामुळे पाणी कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिका(BMC) प्रशासनाने घेतला होता. मात्र, आता धरणे भरु लागल्याने महापालिकेसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहापूर तालूक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण परिसरात पाणी साठा होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, असाच पाऊस आणखी काही काळ कायम राहिल्यास मंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा आणि भातसा ही दोन्ही धरणं लवकरच भरली जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा, Mumbai High Tide: मुंंबई मध्ये समुद्रात भरतीच्या वेळी उसळल्या उंच लाटा, Bandra येथे किनारालगतच्या घरापर्यंत पोहचले पाणी (Watch Video))

प्राप्त माहितीनुसार, मोडकसागर तलाव परिसरात असलेले वैतरणा धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे या धरणाचा पहिला दरवाजा 9.24 आणि दुसरा 9.35 ला उघडण्यात आला. लवकरच तानसा धरणही भरेल असा अंदाज आहे. तानसा धरण भरण्यासाठी पाणी पातळी आणखी 2.50 फूटांनी वाढणे गरजेचे आहे.