Mumbai High Tide Video Bandra (Photo Credits: Twitter)

मुंंबई शहरात पश्चिम उपनगरांंमध्ये आज सकाळपासुन जोरदार पावसाला (Mumbai Rains) सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजुन 39 मिनिटांनी मुंंबईच्या समुद्र किनार्‍यात 4.42 मीटर उंचीच्या लाटा (High Tide) उसळल्या होत्या. आयएमडी आणि बीएमसी तर्फे या भरतीच्या वेळेबाबत अगोदरच माहिती देण्यात आली होती,त्यामुळे कुठेही दुर्घटना झाल्याचे वृत्त सुदैवाने समोर आलेले नाही. मात्र या भरतीच्या वेळी वांद्रे (Bandra) येथील किनारालगतच्या घरापर्यंत पाणी पोहचल्याचे समजत आहे. ANI या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका व्हिडिओ मध्ये या भरतीच्या वेळी समुद्रात उसळणार्‍या उंचच उंच लाटा पाहायला मिळत आहेत.आयएमडीच्या (IMD)  माहितीनुसार पुढील 48 तास मुंंबई मध्ये पाउस (Mumbai Rain Forecast) कायम राहणार आहे मात्र आता दुपार पासुन काही वेळासाठी मुसळधार पाउस होण्याची शक्यता कमी आहे, रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढु शकतो. (Maharashtra Monsoon Update: पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर 18,19 ऑगस्टसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी)

दुसरीकडे मुंंबई, ठाणे, कोकण भागासहितच मध्य महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापुर या भागात सुद्धा पावसाने गेले काही दिवस जोर धरला आहे. परिणामी सांगली मध्ये कृष्णा नदी धोक्याची पातळी गाठण्याच्या मार्गावर आहे. तर, कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, या नदी पात्रा लगतच्या भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

मुंंबई High Tide Video

दरम्यान, हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये येत्या पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, मराठवाडा व विदर्भ येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः सोलापुर,सांगली, लातुर, उस्मानाबाद, जळगाव, सिंधुदुर्ग या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे