Rain | representative pic- (photo credit -pixabay)

उशीराने दाखल झालेला मान्सून (Monsoon) जोरदार बॅटींग करण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज (Weather Forecast) व्यक्त करताना भारतीय हवामान विभागाने (IMD) थेट इशारा दिला आहे. पुढचे तीन ते चार तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत. या चार तासांमध्ये राज्यात मुसधार पावसाची शक्यता आहे. खास करुन मुंबई, मुंबई उपनगर आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात. शिवाय पुढच्या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे काही तास आणि दिवस घरातून बाहेर पडणार असाल, शेतीची कामे करणार असाल तर आभाळाकडे लक्ष ठेवा आणि आयएमडीने दिलेला सल्लाही ध्यानात घ्या.

हवामान खात्याने म्हटले आहे की, मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे आणि पुढे नाशिक, पुणे, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही मध्य ते तीव्र पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खास करुन मुंबईकरांना. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता)

ऑरेंज अलर्ट (पुढचे दोन दिवस)- मुंबई, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा

ट्विट

हवामान विभागाने माहिती देताना म्हटले आहे की, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यासाठी 27 आणि 28 जून हे दोन दिवस महत्त्वाचे असणार आहेत. महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणि विदर्भात अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. शिवाय 29 आणि 30 जुलै या दोन दिवसांमध्येही महाराष्ट्रात दमदार पाऊस कोसळू शकतो. काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.