Dada Bhuse | (Photo Credits: Twitter)

राज्यात दाखल झालेल्या मान्सूनची (Maharashtra Monsoon 2022) शेतकऱ्यांप्रति उदासीनता दिसून आली आहे. मान्सून दाखल होऊनही अपेक्षेप्रमाणे बरसत (Rain 2022) नसल्याने मशागत करुन बसलेल्या शेतकऱ्यांना काय करावे हा प्रश्न पडला आहे. कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मान्सून अद्याप हवा तसा बसरला नाही. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे दादा भुसे (Dada Bhuse Advice to Farmers) यांनी म्हटले आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यालाच लागून यंदा मान्सूनही चांगला बरसेल असा शेतकऱ्यांचा होरा होता. मात्र तसे घडले नाही. मान्सून बरसलाच नाही.

दादा भुसे हे कोल्हापूर (Dada Bhuse in Kolhapur) येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मान्सून दाखल झाला आहे. पण तो हुलकाणी देतो आहे. त्यामुळे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी अपूऱ्या पावसात पोरणी करु नये. नाहीतर पावसाने अशीच हुलकावणी दिली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची गडबड करु नये, असे अवाहनच दादा भुसे यांनी केले आहे. (हेही वाचा, औरंगाबाद: कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून खत दुकानदाराचे Sting Operation; शेतकऱ्यांच्या तक्रारीची घेतली दखल)

विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दादा भुसे यांनी म्हटले की, महाविकासआघाडी एकच आहे. त्यांच्यात कोणतीही धुसफूस आणि मतमतांतरे नाहीत. विधानसभा निवडणुकीतही मविआचे सर्व आमदार सोबत असतील. आज संध्याकाळीच शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत एकत्र जमणार आहेत. सर्व आमदारांनी मुंबईत उद्या येण्याचे नियोजन होते. मात्र, त्यात थोडाफार बदल झाला असून आमदार आजच मुंबईत दाखल होतील. विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडीच्या उमेदवाराचाच विजय होईल, असेही भुसे यांनी सांगितले.