
भाजप पक्षाकडून आज शेतकऱ्यांच्या कर्जाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात सोमवारी आंदोलन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी कोल्हापूर मधील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना असे म्हटले की, मान्सूनची सुरुवात झाली आहे. तसेच पेरणीची कामे सुद्धा आता संपणार आहेत. परंतु शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्जच दिले जात नाही आहे. अवकाळी पावसामुळे शेतीच्या पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येईल असे म्हटले होते. मात्र अद्याप शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही.
माजी महसूलमंत्री यांनी असे ही म्हटले आहे की, राज्य सरकारने प्रति हेक्टरसाठी 25 ते 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल असे ही सांगितले होते. मात्र कोणाला काही मिळालेले नाही. पाटील यांनी पुढे असे ही म्हटले की, या संदर्भात सरकारने 18,000 कोटी रुपयांची कर्जमाफी सुद्धा जाहीर केली होती.(औरंगाबाद: कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून खत दुकानदाराचे Sting Operation; शेतकऱ्यांच्या तक्रारीची घेतली दखल)
भाजप नेते यांनी असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसच्या महारोगामुळे आतापर्यंत 18,000 कोटी रुपयांमधील जवळजवळ सात हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 70 टक्के शेतकऱ्यांचे कर्ज थकित आहे. कारण 11 हजार कोटी रुपये खर्चच करण्यात आलेले नाहीत. यामुळेच बँकांकडून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज दिले जात नाही आहे.एका बाजूला शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज दिले जात नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकार त्यांचे उत्पादन विकत घेत नसल्याचे ही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.