Nagpur Bridge Collapsed (Photo Credits: Twitter)

Maharashtra Monsoon 2020: महाराष्ट्रात मागील आठवड्याभरात जोरदार पाउस झाला आहे. यावेळेस कोकण, रायगड, मुंंबई, ठाणे सोबतच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, नागपुर मध्ये सुद्धा जोरदार पाउस होत आहे. गडचिरोली, भंंडारा भागात पावसामुळे पुरजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. अशातच नागपूर मधुन असाच पावसाचा परिणाम समोर येत आहे. नागपुर (Nagpur)  मध्ये रामटेक येथील नदीवरचा पुलाचा काही भाग आज संंध्याकाळी कोसळुन (Nagpur Bridge Collapsed) पडला आहे. या भागात काही दिवसांंपासुन तुफान पाउस सुरु आहे यामुळेच या पुल कमकुवत होउन कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. भंडारा, नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती; नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे नाना पटोले यांचे निर्देश

ANI या वृत्त संंस्थेने या दुर्घटनेचे काही फोटो शेअर केले आहेत यामध्ये आपण पाहु शकता की, पुलाला अगदी मधोमध तडा गेला असुन हा मधला भागच कोसळुन पाण्यात पडला आहे. केवळ कोसळलेलाच भाग नव्हे तर पुलाच्या टोकाला सुद्धा पावसामुळे बरीच माती वाहुन गेल्याचे दिसतेय, या घटनेनंंतर या भागात नागरिकांंनी गर्दी केली होती.(Maharashtra Rains Update: मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता)

ANI ट्विट

दरम्यान,काल 29 ऑगस्ट पर्यंत नागपुर मध्ये 800 मिमी हुन अधिक पाउस झाला आहे. संपुर्ण नागपुर विभागात अपेक्षेच्या 97% पाऊस झाला आहे. या पट्ट्यातील जिल्ह्यात गडचिरोली मध्ये मागील काही दिवसात सर्वाधिक पाउस झाल्याचे समजतेय.