महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. यातच मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगडसह (Raigad) कोकणच्या किनारपट्टीवर (Kokan) पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रीय आहे. त्यामुळे या भागात पावसाचा मुक्काम लांबला आहे. मुंबई शुक्रवारीसकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे दादर, भांडूप, विक्रोळी येथील अनेक सखल भागात पाणची साचले होते. ज्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावा लागत आहे. तसेच मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूकदेखील ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबई ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंत हलक्या सरी कोसळतील. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात 200 मि.मीहून अधिक पावसाची शक्यता आहे. हे देखील वाचा- Mumbai Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा संपूर्ण वेळापत्रक

ट्वीट- 

गुरुवारी रात्री उशिरापासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेपासून काही भागांत हा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी 8.30 पासून 12 तासांमध्ये पनवेल, बेलापूर, घणसोली, पावने एमआयडीसी सानपाडा अशा ठिकाणी 80 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. कल्याण-डोंबिवलीमध्येही 12 तासांत 80 मिलीमीटरहून जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली. कोपरी येथे 12 तासांमध्ये 73 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. दहिसर, कांदिवली, राम मंदिर, वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी या ठिकाणी दिवसभरात 40 ते 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.