Mumbai Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Local (Photo Credits-File Image)

मुंबईच्या मध्य (Central) आणि हार्बर (Harbour Line)  रेल्वे मार्गांवर आज विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, ठाणे आणि कल्याण दरम्यान अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच पनवेल-वाशी अप व डाउन मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 340 दरम्यान सर्व रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 3 या वेळेत सुटणाऱ्या पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 या वेळेत बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागात विशेष लोकल गाड्या धावतील.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.17 या वेळेत सुटणा-या डाउन जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर, कल्याण येथून सकाळी 9.47 ते दुपारी 2.47 दरम्यान सुटणारी जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील तसेच ठाणे येथून अप फास्ट मार्गावर वळविण्यात येतील व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे आहे. हे देखील वाचा- Maharashtra Unlock 4: 'मुंबई लोकल सुरु करण्यास रेल्वे तयार' पण ही आहे अडचण, घ्या जाणून

मध्य रेल्वेचे ट्वीट-

सध्या लोकल प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे खासगी कार्यालयातील कर्मचारी, छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार इत्यादींना पूर्णपणे बेस्ट, एसटी व खासगी वाहनावरच अवलंबून राहावे लागते. या प्रवासात तासंतास जातो. त्यामुळे मानसिक व शारीरीक हालही होतात. रेल्वे प्रशासन लोकल सुरु करण्यास उस्तुक आहे. मात्र, प्रवासाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारकडे बोट दाखवले आहे.