Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
19 minutes ago

घाटकोपर ते कल्याण स्लो मार्गावर लोकल रवाना; Maharashtra Monsoon 2019 Live Updates

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे | Sep 04, 2019 05:02 PM IST
A+
A-
04 Sep, 17:02 (IST)

-मुंबईत सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांना सांताक्रुझ आणि बांद्रे येथे राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.

04 Sep, 16:39 (IST)

-मुंबईत पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाची शक्यता, गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

-तसेच गरज भासल्यास 100 क्रमांकावर फोन करुन नागरिकांना मदत मिळणार आहे.

04 Sep, 14:46 (IST)

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकात रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. दरम्यान अंधेरी व चर्चगेट, तसेच वसई ते विरार दरम्यान लोकलसेवा बंद पडली आहे. तूर्तास वसई ते अंधेरी दरम्यान धीम्या गतीने लोकलची वाहतूक सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.

04 Sep, 14:17 (IST)

आज सकाळपासून मुंबईच्या मुसळधार  विमान वाहतुकीला देखील बसला होता.अशातच आता अंधेरी येथील डॉमेस्टीक विमानतळात पावसाचे पाणी शिरल्याचे समजत आहे.

04 Sep, 14:10 (IST)

पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस स्टेशन मध्ये  पावसाचे पाणी शिरूल्याची माहिती सध्या समोर येत आहे. पोलीस स्थानकातील टेबल खुर्च्या सर्व काही पावसाच्या पाण्यात असून जवळपास कंबरेभर पाणी साचल्याने समजत आहे.

04 Sep, 14:00 (IST)

अतिवृष्टीमुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कुर्ला येथील क्रांती नगर सह काही सखल भागात पाणी साचले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एनडीआरएफ पथकाने परिसरातील 1300 नागरिकांना सुरक्षित स्थानी हलविले आहे.

04 Sep, 13:38 (IST)

-सीएसएमटी-ठाणे दरम्यान  वाहतुक मुसळधार पावसामुळे कोलमडली

-हार्बर मार्गावरील वडाळा-वाशी  दरम्यान वाहतूकीचा खोळंबा

>>या मार्गावरील वाहतूक सुरु

 -सीएसएमटी-वडाळा-अंधेरी/गोरेगाव 

-वाशी-पनवेल; ठाणे-वाशी/पनवेल

-ठाणे-कसारा/कर्जत/खोपोली

04 Sep, 13:28 (IST)

- विक्रोळी-कांजुरमार्ग दरम्यान सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर ठाणे-कसारा/कर्जत दरम्यान वाहतुक सुरु आहे.

04 Sep, 13:19 (IST)

मुंबईत पावसाचे स्वरूप  वेळेनुरूप आणखीनच रौद्र होत आहे. अशातच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मासिक सरासरीच्या 341 मिमी पावसाचा आकडा ओलांडून अवघ्या चार दिवसात 403 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. याबाबत स्कायमेट मराठीच्या माहितीनुसार केबवल सांताक्रूझ मध्येच 121 तर ठाण्यात 173 मिमी पाऊस पडला आहे.

04 Sep, 13:10 (IST)

मुसळधार पावसामुळे कुर्ला ते चुनाभट्टी दरम्यान  रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकलची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. दरम्यान सीएसएमटी ते अंधेरी / गोरेगाव तसेच वाशी पांवे ट्रान्सहार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक तूर्तास तरी सुरळीत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विट करून दिली आहे.

Load More

Mumbai Rains and Traffic Update: मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबई शहरांसह उपनगरांमध्येही सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत इतक्या तासांच्या पावसानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे पण, मध्य रेल्वे अद्यापही ठप्प आहे. मुंबई सतत होणाऱ्या पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तर, रस्तेवाहतुकीवर वाहतुककोंडीमुळे मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेने प्रवाश्यांसाठी रद्द आणि उशीरा झालेल्या गाड्यांविषयी Update जारी केले आहे. सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील पाऊस आणि उर्वरीत महाराष्ट्रातील पावसाच्या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी अपडेट राहा लेटेस्टली मराठी सोबत.


Show Full Article Share Now