आपल्या होणाऱ्या पत्नीचा तिच्या एक्स बॉयफ्रेन्डसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नवरदेवाने लग्नास नकार दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरूणीच्या एक्स बॉयफ्रेन्डनेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला हा व्हिडिओ पाठवला आहे. यानंतर पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला अटक झाली आहे. सदर घटना मुंबईतील (Mumbai) डी.बी मार्ग पोलीस ठाण्याच्या (D.B Marg Police Station) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी डी.बी मार्ग पोलिसांनी पुढील चौकशी करीत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी (वय, 22) मरीन लाईन्स येथे घरकाम करते. दरम्यान, पीडिताचे एका तरूणासोबत लग्न ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. परंतु, पीडिताच्या एक्स बॉयफ्रेन्डने तिच्याशी शाररिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ तिच्या होणाऱ्या पतीला पाठवला आहे. ज्यामुळे त्यांचे लग्न मोडले आहे, अशी तक्रार पीडिताने डी.बी पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एका 24 वर्षीय तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहे. हे देखील वाचा-PMC: पुणे महापालिकेतील एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध सुरु होते. दरम्यान, त्यांनी मुंबईच्या ग्रॅंटरोड येथील हॉटेलच्या एका खोलीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यावेळी आरोपीने अश्लील व्हिडिओचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. त्यानंतर हाच व्हिडिओ आरोपीने तिच्या होणाऱ्या पतीला पाठवला. ज्यामुळे पीडिताचे लग्न मोडल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे.