CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहेच. पण कोरोनाच्या स्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यास यश आल्याचे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभुमीवर आता राज्यातील कंन्टेंमेंट झोनमध्ये 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु मिशिन बिगिन अगेन नुसार ज्या गोष्टी टप्प्या टप्प्यानुसार सुरु केल्या आहेत त्या चालूच राहणार आहेत. मात्र आज लॉकडाऊन बद्दलचा निर्णय राज्य सराकराने कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(MSRTC Smart Card योजनेला मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ; मंत्री अनिल परब यांची घोषणा)

राज्यात टप्प्याटप्प्यानुसार काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोंबर रोजी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ज्या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या त्यानुसार गोष्टी सुरु राहणार आहेत. तर काही दिवसांपूर्वीच सरकारने धार्मिक स्थळे सुद्धा पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ती पुढे ही सुरुच राहणार आहेत. त्याचसोबत डिसेंबर महिन्यानंतर कोरोनाची राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(Mumbai Local ट्रेन मध्ये महिला प्रवासांसोबत लहान मुलांना परवानगी नाही; रेल्वेस्थानकांत RPF जवान ठेवणार लक्ष)

दरम्यान, लॉकडाऊन वाढवला असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन ही करण्यात आले होते. तर राज्यात आज कोरोनाचे आणखी 6185 रुग्ण आढळले असून 4089 जणांची प्रकृती सुधारली आहे. त्याचसोबत 85 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बाधितांचा आकडा 18,08,550 वर पोहचला आहे.