MSRTC Smart Card योजनेला मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ; मंत्री अनिल परब यांची घोषणा
ST Bus | (Photo Credit: MSRTC)

कोरोना संकट काळात एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड (MSRTC Smart Card) योजनेला 30 नोव्हेंबरपर्यंत यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. पण आता त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष, मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याबद्दल माहिती देताना एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून 27 वेगवेगळ्या सामाजिक घटकांना 33 ते 100% पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. हा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकासोबत जोडलेले स्मार्ट कार्ड घ्यायचं असतं. पुणे: MSRTC बसचालक पदी पहिल्यांदा आदिवासी महिलांची वर्णी, प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

दरम्यान सध्या कोरोना संकटाचा काळ असल्याने वयोवृद्ध किंवा अन्य सवलत धारक मंडळीसुद्धा त्याचा फायदा घेऊ शकत नसल्याने आता एसटीच्या या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही त्यांना 31 मार्च 2021 पर्यंत करता येणार आहे. तसेच ज्या मार्गावर एसटीची सेवा सुरू आहे तिथे लाभ देखील घेता येणार आहे.

महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक राहणार आहे. एसटीच्या प्रवासी सवलत योजनेसाठी हे कार्ड आवश्यक राहणार आहे. अद्याप स्मार्ट कार्ड योजना पूर्णपणे कार्यांवित झाले नसल्याने वयोवृद्ध ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड पाहून एसटी प्रवासात सवलत मिळवता येणार आहे.