महाराष्ट्र मिशन बिगिन अगेन म्हणत राज्यात पुन्हा हळूहळू व्यवहार सुरू झाले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल देखील सशर्त नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. यामध्ये नवरात्रीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोबतच इतर सामान्य महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळा टाळत मुंबई लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र पश्चिम रेल्वेने आता महिला प्रवाशांना ही परवानगी केवळ त्यांना आहे याची आठवण करून दिली आहे. महिलांना प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत लहान मुलांना घेऊन जाता येणार नाही. लहान मुलांसोबत महिलांनी रेल्वे प्रवास करू नये म्हणून आता प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवेशद्वाराजवळ RPF जवान तैनात असतील. Mumbai Local Trains: मुंबई लोकल मधील गर्दीचं नियोजन करण्यासाठी App आणि Colour Coding यंत्रणेचा वापर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार.
दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता अन्य महिला प्रवासी सकाळी 11 ते 4 आणि संध्या 7 ते शेवटची लोकल याद्वारा प्रवास करू शकतात. त्यासाठी त्यांना विना क्युआर कोड थेट रेल्वे तिकीट काढून प्रवास करण्याची मुभा आहे. दरम्यान त्यासाठी मास्कचा वापर, रेल्वे डब्ब्यात सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे नियम इतरांप्रमाणेच लागू आहेत.(Face Mask Fine in Maharashtra: विनामास्क प्रवास केल्यास भरावा लागणार 200 रुपये दंड, रेल्वे पोलिसांना अधिकार).
ANI Tweet
Only women permitted to travel in local trains during the allotted time over Mumbai Metropolitan region. No children are allowed to travel in local trains. RPF to be deputed at each entry gate to restrict the entry of children: Western Railway
— ANI (@ANI) November 27, 2020
कोरोना संकटामध्ये मध्यंतरी नियंत्रणात आलेली परिस्थिती पाहता लोकल सर्व सामान्यांसाठी पुन्हा खुली करावी यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यामध्ये बोलणी सुरू होती. पण आता दिवाळी नंतर पुन्हा कोरोनाबाधितांच्या होणारी वाढ पाहता 15 डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांना सरसकट रेल्वे प्र्वास सुरू होणार नसल्याची माहीती 2 दिवसांपूर्वी दिली आहे.