Face Mask Fine in Maharashtra: विनामास्क प्रवास केल्यास भरावा लागणार 200 रुपये दंड, रेल्वे पोलिसांना अधिकार
Mumbai Local Trains | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तुम्ही जर रेल्वे प्रवास करणार असाल तर नियमांकडे लक्ष द्या. महाराष्ट्र सरकारने रेल्वे पोलिसांना (GRP) नुकतेच निर्देश दिले आहेत की, विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड (Fine) वसूल करण्यात यावेत. त्यामुळे चेहऱ्यावर मास्क (Face Mask असणे आवश्यक आहे. हा दंड मुंबई लोकल (Mumbai Loca) प्रवासादरम्यान आकारण्यात येणार आहे. आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरस संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने हे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी जीआरपी आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा दंड बृहन्मुंबई महानगरपालिकेने (MCGM) 9 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आकारला जाईल. दरम्यान, MCGM सार्वजनिक ठिकाणी मुखवटे न सापडलेल्या लोकांना 200 रुपये दंड ठोठावत आहे.

महापालिकेच्या परीपत्रकानुसार, मुंबई लोकलमधून प्रवास करताना किंवा स्टेशन (Railway stations) परिसरात मास्क न लावता फिरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, प्रवाशाला दंड आकारण्याचा रेल्वे पोलिसांना अधिकार आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याासठी आपण सर्व नियम, संकेत पाळले पाहिजेत असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

सेनगावकर यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, त्यांना हे पत्र बुधवारी सायंकाळीमिळाले. त्यानुसार एमसीजीएमशी समन्वय साधून निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी पुढची पावले टाकली जातील, असे सेनगावकर यांनी सांगितले. (हेही वाचा, Mumbai Local Train for All: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सेवा सुरु करण्यातसंदर्भात महाराष्ट्र सरकारचे रेल्वे मंत्रालयाला पत्र)

राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 15 जून पासून रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. आता त्यात वाढ करुन उपनगरिय रेल्वेच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.

सध्या स्थितीत उपनगरी मार्गावर रेल्वेच्या 1,410 विशेष रेल्वे सेवा सुरु आहेत. तसेच 10 महिला स्पेषल गाड्या धावत आहेत. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना गर्दी नसलेल्या कालावधीत (Non-Peak Hours) प्रवास करण्यासही मुभा आहे.