Mumbai Local Trains: मुंबई लोकल मधील गर्दीचं नियोजन करण्यासाठी App आणि Colour Coding यंत्रणेचा वापर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार
Mumbai Local (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल (Mumbai Local) सुरु करण्याच्या प्रयत्नात सध्या महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आहे. परंतु, लोकल मधील गर्दीमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार वेब बेस्ड अॅपवर (App) काम करत आहे. तसंच कलर कोडिंग स्टिटमची (Colour Coding) देखील वापर करण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांसाठी तीन टप्पांत प्रवासाची आखणी करण्यात आली आहे. तर प्रत्येक तासानंतर लेडिज स्पेशल ट्रेनची सोय करण्यात येणार आहे. दिवाळी आणि ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्र सरकार सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा विचार करत असताना मुंबई पालिकेने मात्र यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची चिंता व्यक्त केली आहे. (कलर कोडेड ई पास यंत्रणा म्हणजे काय जाणून घ्या)

दिवाळी आणि ऐन सणासुदीच्या काळात अधिक लोक खरेदी किंवा इतर कारणांसाठी बाहेर पडतील. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता दाट असून परिणामी कोविड-19 संसर्गाचा धोका वाढेल, असे मुंबई महानगरपालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, 1 नोव्हेंबर पासून मुंबईतील सर्व रेस्टॉरंट्स 50% क्षमतेने सुरु करण्यात येणार आहेत. यापूर्वी ही क्षमता 33% इतकी होती. (Face Mask Fine in Maharashtra: विनामास्क प्रवास केल्यास भरावा लागणार 200 रुपये दंड, रेल्वे पोलिसांना अधिकार)

मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 255360 वर पोहचला आहे. त्यापैकी 225526 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 19082 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृतांचा संख्या 10229 इतकी झाली आहे. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र मिशन बिगेन अनेग अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सेवा-सुविधा नियमित सुरु राहणार आहेत.