महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदावरुन सुरु असलेला गोंधळाचा तिढा आता सुटणार आहे. कारण आता निवडणूक आयोगाने राज्य विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूकीचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे राजपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अपील स्विकारले आहेत. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक पार पडणार आहे. याच दरम्यान आता भाजप (BJOP पक्षाने विधान परिषद निवडणूकीसाठी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत प्रविण दटके, गोपीचंद पडलकर, अजित गोपछडे आणि रजणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षाने माजी मंत्री पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न दिल्याने धक्का बसला आहे. तर मुंडे किंवा खडसे यांना संधी दिली जाईल आणि त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल अशी चर्चा सुरु होती. मात्र त्यांना पक्षाने डच्चू देत आपल्या पक्षाची उमेदवार यादी जाहीर केली आहे.
भाजप पक्षाचे प्रवक्ते प्रविण दवणे यांनी सुद्धा ट्वीट करत उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. परंतु विधान परिषदेच्या निवडणूकीत रिंगणात उतरवण्यासाठी भाजपने त्यात एकाही दिग्गज नेत्याला संधी न दिल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.(महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 21 मे दिवशी मुंबई मध्ये होणार; उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा)
Bharatiya Janata Party (BJP) releases list of candidates for biennial elections for Maharashtra Legislative council scheduled to be held on 21st May. pic.twitter.com/0QB8JL3kAE
— ANI (@ANI) May 8, 2020
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवण्यासाठी या निवडणूकीला सर्वाधिक महत्व आहे. 2019 मध्ये 29 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात त्यांना विधिमंडळामध्ये निवडून येणे गरजेचे होते अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशावेळेस राज्य मंत्रिमंडळाकडून दोनदा विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कोमोर्तब करून त्यांना नियुक्ती व्हावी असा प्रस्ताव देण्यात आला होता. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने निवडणूकीच्या वेळी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर करण्यात आली आहे