सीएम उद्धव ठाकरे (Photo Credit- PTI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून राज्यात सुरू असलेला राजकीय पेच आता सुटणार आहे. आज काही वेळापूर्वीच भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यात निवडणूकांसाठी करण्यात आलेल्या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता ही निवडणूक 21 मे दिवशी होईल.  उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवण्यासाठी या निवडणूकांना विशेष महत्त्व आहे. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र सहा महिन्यांत त्यांना विधिमंडळामध्ये निवडून येणं गरजेचे होते अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशावेळेस राज्य मंत्रिमंडळाकडून दोनदा विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कोमोर्तब करून त्यांना नियुक्ती व्हावी असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र तो मंजुर करण्याऐवजी आता विधानपरिषदेच्या निवडणूक घेण्याचा निर्णय झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकामध्ये 27 मे पूर्वी या निवडणूका घेतल्या जाव्यात असं नमुद केलं होतं त्यानुसार आता ही निवडूक 21 मेलाहोणार.  त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा विधिमंडळामध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून प्रवेश करून मुख्यमंत्री पद टिकवण्याचा प्रयत्न होणार आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळातील निवडून न आलेल्या व्यक्तीला सहा महिन्यांच्या आत निवडून येणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा; विधिमंडळ सदस्यत्वाबाबत संवाद झाल्याचे वृत्त.

ANI Tweet

संजय राऊत ट्वीट

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचं संकट आहे. अशामध्ये निवडणूका घेण्यासाठी खास गाईडलाईंन्सदेखील जारी करण्यात आल्या आहे. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा करून या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली होती.