महाराष्ट्रात (Maharashtra) 'जीनोम सिक्वेंसींग' दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या डेल्टा प्लस फॉर्मची (Delta Plus Variant) एकूण 45 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील जळगावात डेल्टा प्लसचे 13 रुग्ण आढळून आले आहेत. तर, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 11 जणांची कोविड-19 डेल्टा प्लस व्हेरिअंटची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात रविवारी माहिती दिली आहे. तसेच “जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवलेल्या 80 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस फॉर्मच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे, असे विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 45 रुग्णांपैकी जळगाव (13), रत्नागिरी (11), मुंबई (6), ठाणे (5), पुणे (3) आणि पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमधील प्रत्येकी एक आहेत. यापैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणे आहेत. जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यांची नेमकी संख्या आणि वेळ सांगण्यात आलेली नाही. हे देखील वाचा- Mumbai Local Update: रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करुनच मुंबई लोकलबाबत निर्णय; मुंबई मनपा आयुक्त चहल यांची माहिती
एएनआयचे ट्वीट-
The number of Delta Plus cases in Maharashtra has increased from 21 to 45, including 27 men & 18 women. We're collecting info from patients on vaccinations, illnesses & tracking, tracing operations are in progress. There's no cause for concern: Rajesh Tope, State Health Minister pic.twitter.com/Qk9GdzjRWg
— ANI (@ANI) August 8, 2021
सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या रुग्णांत होणारी वाढ पाहता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत.