Maharashtra Power Outage: वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी छत्तीसगडची कोळसा खाण महाराष्ट्र सरकार घेणार ताब्यात, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
Power Lines | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील वीजकपात (Power outage) सातत्याने वाढत आहे. अनेक भागात लोकांना तासंतास लोडशेडिंगचा (Load shedding) सामना करावा लागत आहे.  वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून (State Government) प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी छत्तीसगडची कोळसा खाण (Coal mine) ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे. यासोबतच लाईट फेल्युअरच्या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकार इतर देशांतूनही कोळसा आयात करण्याची तयारी करत आहे. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. दुसरीकडे महाराष्ट्रात वाढत्या लोडशेडिंगच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाला आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोडशेडिंगविरोधात भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी अजित पवार यांनीही राज्यातील वीज संकटाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. हेही वाचा Ganesh Naik: भाजप आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला

ते म्हणाले, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरात कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्र सरकार छत्तीसगडमधील कोळसा खाण ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. त्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत प्रयत्नशील आहेत.  छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. यासाठी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा सुरू असून, याशिवाय परदेशातून कोळसा आयात करण्याचाही विचार केला जात आहे.

अजित पवार यांना विचारले असता केंद्राकडून राज्याला कोळशाचा पुरवठा योग्य प्रकारे केला जात नाही का? यामागे काही राजकारण आहे का? या प्रश्नाला अजित पवार यांनी अतिशय सोप्या शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात कोळशाच्या टंचाईची समस्या आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये वाढत्या मागणीच्या तुलनेत केंद्र सरकार कोळशाचा पुरवठा करू शकत नाही. वाढत्या उन्हामुळे मागणी वाढली आहे. गरजेइतका कोळसा उपलब्ध होत नाही, असा आरोप मला करायचा नाही, पण कोळशाच्या तुटवड्याचे संकट आहे हे वास्तव आहे.