Sanjay Raut (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी हालचाली वाढल्या असून शिवसेनेला आज संध्याकाळी 7.30 पर्यंत वेळ राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी देऊ केला आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यानुसार आता शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाकडून समर्थन मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याबाबत आयएनएस यांनी अधिक वृत्त दिले आहे.

राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप असून सुद्धा त्यांनी सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता शिवसेना हा राज्यातील दुसरा मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी सत्ता स्थापनासाठी हालचाली वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री यंदा राज्यात दिसून येईल असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळेच भाजप सोबत मुख्यमंत्री पदावरुन मतभेद झाल्याने शिवसेनेना त्यांना पासून दूर झाल्याचे दिसून येत आहे. मात्र शिवसेना आता राष्ट्रवादी पक्षासोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. तसेच मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडणार आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि पक्षातील अन्य नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहेत.(शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा)

 महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना अधिक मते मिळवणारा राज्यातील दुसरा मोठा पक्ष निवडूकीच्या निकालानंतर दिसून आले. परंतु भाजप-शिवसेना युतीने बहुमताचा आकडा पार केला, पण 50-50 च्या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रात अद्याप सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही.