महाराष्ट्र: कोरोना व्हायरसंबंधित सोशल मीडियात खोटी माहिती, अफवा पसरवल्याने 161 गुन्हे दाखल तर 48 तासात 39 जणांना अटक
Coronavirus | Representational Image | (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले असले तरीही नागरिक या नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यामुळे लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऐवढेच नाही तर राज्यात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर ते आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसंबंधित खोटी माहिती, अफवा आणि आक्षेपार्ह विधाने केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी 161 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच गेल्या 48 तासात 39 जणांचा अटक करण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घरीच थांबा अशा वारंवार सुचना देण्यात आल्या आहेत. तरीही काही नागरिक सकाळच्या वेळेस भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियात कोरोनासंबंधित खोटी माहिती दिली जात आहे. मात्र तुम्ही जर सोशल मीडियात सध्याच्या परिस्थितीसंबंधित खोटी माहिती किंवा अफवा पसरवल्यास थेट पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. तर गेल्या 48 तासात 39 जणांचा अटक करण्यात आली असून 30 एफआयआर आणि 39 जणांची ओळख पटली आहे.(मुंबई: धारावी पोलिस स्टेशन बाहेर खासदार राहुल शेवाळे यांनी उभारली Sanitization Tent; कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना)

दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पार गेला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून दिवसेंदिवस महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू तर 896 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिली आहे.