1 मे हा महाराष्ट्र दिन (Maharshtra Din) आणि कामगार दिन (Labour day) म्हणून साजरा केला जातो. 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर दिल्लीश्वर महाराष्ट्रासमोर झुकले आणि त्यांनी मराठी लोकांच्या मागणीनुसार, भाषावार प्रांतरचनेनुसार, मराठी बोलणार्यांचे स्वतंत्र मराठी राज्य स्थापन करण्यास मदत केली. यशवंतराव चव्हाण महराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. आज महाराष्ट्रासह देशा-परदेशात 59 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. मग या दिवसाचं औचित्य साधून अनेक राजकारणी, कलाकार मंडळींनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Happy Maharashtra Day 2019 Wishes: 'महाराष्ट्र दिना'निमित्त WhatsApp Status, Messager यांच्या माध्यमातून मेसेज, ग्रिटिंग्स, Quotes, SMS द्वारे शेअर करा या शुभेच्छा!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
नरेंद्र मोदी
Greetings to my sisters and brothers of Maharashtra on the state’s Foundation Day.
Maharashtra is a land of revolutionaries and reformers who have enriched India’s progress. Praying for the continued growth of the state in the times to come.
Jai Maharashtra!
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) May 1, 2019
देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र
ज्ञानोबा-तुकोबांचा महाराष्ट्र
ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र
जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !#महाराष्ट्रदिन pic.twitter.com/nVUwMYFEcd
— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2019
राष्ट्रनिर्माणातील
पहिला आणि मुलभूत योगी
‘श्रमयोगी’ ..!
आजच्या कामगार दिनाच्या सर्व बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा !
॥ श्रमेव जयते ॥#LabourDay #कामगारदिन pic.twitter.com/5OCiREzSV3
— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2019
रितेश देशमुख
गर्व या मातीत जन्मलेचा!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! #MaharashtraDay
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 1, 2019
All labour that uplifts humanity has dignity and importance and should be undertaken with painstaking excellence. - Martin Luther King Jr #LabourDay #MayDay 🙏🏽🙏🏽
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 1, 2019
शरद पवार
आपल्या महाराष्ट्र राज्यावर सध्या दुष्काळाचं सावट आहे, बळीराजा हवालदिल आहे, तरूणांना रोजगार नाही, कष्टकऱ्यांच्या हातांना काम नाही. या सर्व संकटांवर मात करून आपल्या समृद्ध, संपन्न राज्याची विकासाची परंपरा अखंडीत ठेवण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग हवा. pic.twitter.com/EezfJrGJ0b
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 1, 2019
उर्मिला मातोंडकर
मुंबई, महाराष्ट्र आणि जगभर पसरलेल्या मराठी मनांना माझ्या महाराष्ट्र दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा..... आणि एक विनंती जमेल तेव्हा शुद्ध आणि सुंदर #मराठी जरूर बोला. आपली भाषा आणि आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! #महाराष्ट्रदिन pic.twitter.com/wIgPNVjzxF
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) May 1, 2019
CP Mumbai Police
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा
।। महाराष्ट्र दिन चिरायू होवो ।। pic.twitter.com/ncc4JNg3YX
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) May 1, 2019
राज ठाकरे
#महाराष्ट्रदिन pic.twitter.com/j2aeOJdmMd
— Raj Thackeray (@RajThackeray) May 1, 2019
महाराष्ट्राने आणि अनेक मराठमोळ्या व्यक्तिमत्त्वांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे आता हा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवून तो जपण्याचे संस्कार देणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे.तुम्हांला ही महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा.