Maharashtra Day 2019 English-Marathi Wishes: अखंड चळवळ आणि हुतात्मांच्या बलिदानानंतर आपल्याला आपला संयुक्त महाराष्ट्र लाभला. 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी बांधवांसाठी खास असणारा हा आजचा दिवस. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसंच महाराष्ट्रासह देशा-परदेशातही हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो.
आपला अभिमान असणाऱ्या या दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी-इंग्रजी मेसेज, ग्रिटिंग्स, Quotes, SMS आणि शुभेच्छापत्रं....
सणवार, खास दिवस यानिमित्ताने व्हॉट्सअॅप विशेष स्टीकर्स उपलब्ध करत असतात. महाराष्ट्र दिनानिमित्त देखील व्हॉट्सअॅप स्टीकर्स उपलब्ध असून तुम्ही त्याद्वारे तुमच्या शुभेच्छा आपल्या आप्तेष्ठांपर्यंत पोहचवू शकता. महाराष्ट्र दिनानिमित्त व्हॉट्सअॅप स्टीकर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!