पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील 25 आरोपींचा जामीन डहाणू सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी एन केळुसकर यांनी मंगळवारी फेटाळून लावला आहे. एप्रिल महिन्यात पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी दोन साधूसह त्याच्या ड्रायव्हरची जमावाकडून हत्या आल्याची घटना घडली होती. विशेष सरकारी वकील अॅड सतीश मानशिंदे यांची गेल्याच महिन्यात राज्य सराकरने नेमणूक केली होती. मानशिंदे यांनी कोर्टाला असे सांगितले की, जामीन मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या आरोपींसंधित पुरेसे पुरावे आहेत.
या प्रकरणातील 66 हून अधिक आरोपी जे आदिवासी जमातीचे आहेत त्यांना कोर्टाने मे महिन्यात न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या सर्वांना एप्रिल 16 रोजी पालघर मध्ये घडलेल्या मॉब लिंचिंग प्रकरणानंतर अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एकूण 160 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले होते.(Palghar Lynching Case Hearing in Supreme Court: पालघर हत्याकांड प्रकारणी जनहित याचिकांवर महाराष्ट्र सरकार आणि अन्य यंत्रणांना उत्तर देण्याचे सर्वोच्च सरकारचे आदेश) तर CID कडून आता पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra Criminal Investigation Department (CID) submits a charge sheet in Palghar lynching case.
— ANI (@ANI) July 15, 2020
पालघर मॉब लिंचिंमध्ये आरोपींनी चिकने महाराज कल्पविक्शगिरी, सुशीलगिरी महाराज आणि त्यांचा ड्रायव्हर निलेश तागडे हे लॉकडाऊनच्या काळात पालघर मधील वाडा जिल्ह्यात आले होते. हे सर्वजण सुरतकडे अंतिमसंस्कारासाठी जाणार होते. या सर्वांना कांदिवली मधील घर सोडले आणि लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्याची सुद्धा परवानगी घेतली नव्हती. या प्रकरणी अद्याप सीआयडी यांच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे.(Palghar Mob Lynching Case: पालघर मॉब लिंचींग प्रकरणामागे धार्मिक कारण नाही - उद्धव ठाकरे)
सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे मोबाईल रेकॉर्ड्स हे आरोपींच्या विरोधातील पुरेसे पुरावे अल्याचे ही मानशिंदे यांनी कोर्टाला म्हटले आहे. रक्ताचे नमुने सुद्धा हैदराबाद मधील फॉरेन्सिंग सायन्स लॅबोरेट्रीकडे पाठवण्यात आल्याचे ही कोर्टासमोर मानशिंदे यांनी सांगितले आहे. तर पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओत जवळजवळ 500 लोक असल्याचे दिसून आले होते. या मॉबने पीडितांवर हल्ला करत त्यांना ठार मारले. या प्रकरणानंतर आरोपींनी जंगलात लपवण्यासाठी आश्रय घेतला. परंतु ड्रोनच्या सहाय्याने त्यांना शोधून काढत ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी 500 संशयित आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामधील काहीजणांनी दादरा-नगर हवेली आणि गुजरात येथे पळ काढला असून त्यांना शोधून काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.